Washim Court : वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.