Warren Buffett : वॉरेन बफे म्हणाले- ही ट्रम्प यांची मोठी चूक, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कडाडून टीका
जगप्रसिद्ध कंपनी बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यावसायिक धोरणांवर टीका केली आहे. कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर बैठकीत (एजीएम) ९४ वर्षीय बफेट यांनी ट्रम्प यांना सल्ला दिला की व्यवसायाला शस्त्र बनवू नये. जगाच्या इतर भागांवर दंडात्मक शुल्क लादणे ही एक मोठी चूक आहे.