Ajit Pawar : अजित पवारांचा बीडमधील गुन्हेगारांना दम- मला वाकड्यात जायला लावू नका, नाहीतर मोक्का लावणार!
“मला वाकड्यात जायला लावू नका. सांगूनही ऐकले नाही, तर मोक्का लावल्याशिवाय राहणार नाही,” अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या बदनामीला कारणीभूत ठरणाऱ्या कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका मांडत, कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.