Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच
चारधाम यात्रेत गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला वक्फ बोर्डाने पाठिंबा दिला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी या मुद्द्यावर आपले मत स्पष्टपणे मांडताना सांगितले की, ज्यांची श्रद्धा सनातन धर्माच्या तीर्थक्षेत्रांशी जोडलेली नाही, त्यांच्या प्रवेशावर बंदी घालणे पूर्णपणे योग्य आहे.