Waqf Act : ‘पाकिस्तानने स्वतःच्या खराब रेकॉर्डकडे लक्ष द्यावे’, वक्फ कायद्याविरोधात बोलणाऱ्याला भारताने फटकारले!
संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्या प्रेरित आणि निराधार असल्याचे सांगत भारत सरकारने मंगळवारी त्या फेटाळून लावल्या. पाकिस्तानने इतरांना उपदेश करण्याऐवजी अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या बाबतीत स्वतःच्या ‘खराब’ रेकॉर्डकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.