Walmik Karad वाल्मिक कराडच्या मुलाने का केली सीबीआय चौकशीची मागणी? महादेव मुंडे प्रकरणाला नवे वळण?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकलेल्या वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलाचं नाव आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात जोडलं जातंय. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) परळीतून ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यामध्ये वाल्मिक कराडच्या श्रीगणेश आणि सुशील या दोन्ही मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांचीही १७ तास कसून चौकशी केल्याची माहितीही समोर आलीये.