High Court, : हायकोर्टाने म्हटले- मतदान स्वातंत्र्य अन् मतदान हक्क वेगवेगळे; यादी पुनरावलोकनाच्या वेळी मतदार म्हणून नोंदणीचा हक्क
मतदानाचे स्वातंत्र्य आणि मतदानाचा हक्क हे दोन्ही वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली, तर पडताळणीच्या कामामुळे अधिकाऱ्यांवर ताण येईल आणि अर्जांचा महापूरच येईल असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.