• Download App
    voter list | The Focus India

    voter list

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीचे काम सुरू आहे. यादरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की बिहारमध्ये मोठ्या संख्येने परदेशी नागरिक आहेत.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “मतदार यादी सुधारणेसाठी आम्ही घरोघरी भेटी दिल्या. या दरम्यान आम्हाला नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमधील मोठ्या संख्येने लोक आढळले.”

    Read more

    Bihar Voter List : बिहारमध्ये मतदार यादीवरून विरोधकांचे आंदोलन; चक्का जाममध्ये महाआघाडीचे नेते उतरले रस्त्यावर, भाजपचाही पलटवार

    बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण विरोधात (एसआयआर) बुधवारी विरोधी पक्षांनी राज्यभर निदर्शने केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीचे विरोधी पक्षनेते पाटण्यातील निषेधात सहभागी झाले. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही प्रक्रिया ‘मोठ्या संख्येने मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवेल,’ ज्याचा सत्ताधारी एनडीएला फायदा होईल.

    Read more

    Bihar Voter List : एडीआर, राजदसह इतरांच्या याचिका; बिहार व्होटर लिस्टप्रकरणी सुप्रीम कोर्टात 10 रोजी सुनावणी

    बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १० जुलै रोजी सुनावणी करणार आहे. आयोगाच्या निर्णयाला एडीआर, पीयूसीएल, आरजेडी आणि काँग्रेससह इतर याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले आहे. सोमवारी, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण उपस्थित करून सुनावणीची विनंती केली.

    Read more

    ममतांच्या पोटनिवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी नोंदविले कोलकत्याच्या मतदार यादीत नाव!!

    वृत्तसंस्था कोलकाता : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपले नाव कोलकत्याच्या मतदार यादीत नोंदवून घेतले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महत्वाच्या भवानीपूर पोट निवडणुकीपूर्वी त्यांनी […]

    Read more