Sandeep Deshpande : बोगस मतदार आढळल्यास ‘मनसे स्टाइल’ने दणका देणार; संदीप देशपांडे म्हणाले- पुरावे देऊनही आयोगाकडून कारवाई नाही
मुंबई राज्यातील 29 हानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मतदार याद्यांमधील घोळावरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाने बोगस मतदारांवर कारवाई केली नसेल, तर आता आम्हीच बघून घेऊ. जिथे बोगस मतदार आढळेल, तिथे त्याला ‘मनसे स्टाईल’ने दणका देऊ, असा सज्जड इशारा देशपांडे यांनी दिला आहे.