Election Commission : ‘वोट चोरी’वर आयोगाने म्हटले- असे घाणेरडे शब्द वापरणे टाळा; हा कोट्यवधी मतदारांवर हल्ला
मतदार यादीत फेरफार आणि मतचोरीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने गुरुवारी उत्तर दिले. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, “‘मतचोरी’ सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी कथा रचण्याचा प्रयत्न करणे हा कोट्यवधी भारतीय मतदारांवर थेट हल्ला आहे.”