Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळवायची आहेत; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात
राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुलचालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.