डोनाल्ड ट्रम्पना “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!
डोनाल्ड ट्रम्पला “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या बहुचर्चित अलास्का वाटाघाटींची फलश्रुती ठरली. दोन्ही नेते अलास्का मध्ये साधारण सहा तास भेटले. त्यातल्या तीन तास द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये कुठलाही करार झाला नाही. युद्ध थांबविण्यासंदर्भात चर्चेतून “प्रगती” झाली. आम्ही पुढचे पाऊल टाकले, एवढेच दोघांनी एकमेकांना आणि नंतर पत्रकारांना सांगितले. युद्ध थांबविण्यासंदर्भात पुतिन यांनी ट्रम्प यांना कुठलाही “शब्द” दिला नाही. उलट युरोपने युक्रेन मध्ये लुडबुड करणे थांबवावे, असे त्यांनी ट्रम्प यांच्या समोर सुनावून घेतले.