Visionary MoU : युवकांना नवीन तंत्रज्ञान अन् औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शी सामंजस्य करार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, येथे महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट (SSRDPT) बंगळुरु आणि स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, बंगळुरु यांच्यामध्ये युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.