Vishwas Patil : मराठा आंदोलन: ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी कशा नाकारता येतील– विश्वास पाटील यांचा सवाल
मराठा आरक्षणाच्या चर्चेत ऐतिहासिक पुराव्यांबाबत प्रश्न निर्माण होत असताना, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, मराठवाड्यातील सलग 40 वर्षांची ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी उपलब्ध आहेत आणि त्या नोंदी कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरल्या गेल्या आहेत. मग अशा नोंदींकडे दुर्लक्ष का केले जाते, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.