Vishwa Hindu Parishad : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने सरकारकडे केली ‘ही’ मागणी!
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध आघाडी उघडली आहे, त्यामुळे आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. देशभरातून कडक कारवाईची मागणी होत आहे. विश्व हिंदू परिषदेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि सरकारने या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. विहिंपने २५ एप्रिल रोजी देशव्यापी निषेधाचे आवाहन केले आहे.