Modi : मोदी व्हर्च्युअल BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, जयशंकर सहभागी होणार
ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ८ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या ब्रिक्स नेत्यांच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींऐवजी भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.