Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटला मंजुरी; सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे मार्गाला सुधारित खर्चासह मान्यता
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील देण्यात आला असून, याशिवाय नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या मुदती, तसेच न्यायालयीन आणि महसूल विभागाशी संबंधित मंजुरी देण्यात आली आहे. विविध विभागांमधील एकूण सात मोठ्या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.