Vikhe Patil : विनोद पाटलांवर विखे पाटलांचा पलटवार, म्हणाले- चर्चा सुरू होती तेव्हा ताजमध्ये झोपले होते!
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत त्यानुसार जीआर देखील काढण्यात आला आहे. परंतु, या जीआरचा टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही मिळणार नसल्याची टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यावेळी बोलताना विखे पाटलांनी विनोद पाटलांवर टीका देखील केली आहे.