Vijaykumar Ghadge : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे थेट अजित पवारांना विचारणार जाब; “माझं चुकलंच काय?” असा सवाल करत मुंबईकडे प्रस्थान
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीचा जाब थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्याचा निर्णय घेतला आहे. “मी काय चूक केली? मी कुणाला वाईट बोललो का? जर काही चूक झाली असेल, तर त्यांनीच मला समोर सांगावं, असे सांगत ते लातूर येथी रुग्णालयातून थेट मुंबईला निघाले आहेत.