Parinay Phuke : ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी वडेट्टीवारांची अवस्था; परिणय फुके यांचा घणाघात, शरद पवारांबाबतही केले मोठे भाष्य
काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पेचावरून भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ” चंद्रपुरात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापित करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. वडेट्टीवारांची सध्या नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था आहे,” असे परिणय फुके म्हणालेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले.