Vijay Shah : मंत्री विजय शाह वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने SIT स्थापन केली; माफीनामा फेटाळला, पण अटक स्थगित
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तथापि, न्यायालयाने त्यांच्या अटकेलाही स्थगिती दिली आहे.