Mundhwa Land Scam : मुंढवा भूखंड घोटाळ्यात ट्विस्ट; पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.