Vijay Kumar Malhotra : भाजप नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे निधन; दिल्लीचे पहिले भाजप अध्यक्ष, मनमोहन सिंग यांचा केला होता पराभव
भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीच्या एम्समध्ये दाखल होते. आज सकाळी एम्सने त्यांच्या निधनाची घोषणा केली.