Maharashtra : विरोधी पक्षनेता नसणे म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटणे, विधानसभेत गदारोळ करतविरोधकांचा कामकाजावर बहिष्कार
महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जागा अद्यापही रिकामीच असल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानसभेतील स्वागत सोहळ्याच्या दिवशीच विरोधकांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आणि परंपरेचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी हे प्रकरण केवळ राजकीयच नव्हे तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेशी निगडित असल्याचा आरोप करत कामकाजावर बहिष्कार टाकला.