Odisha Women : कर्नाटकातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची एक रजा मिळेल; वर्षातून अशा 12 सुट्ट्या
कर्नाटकातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सशुल्क मासिक पाळी रजा लागू करण्यात आली आहे. महिलांना वर्षातून अशा 12 रजा मिळतील. राज्य सरकारने 9 ऑक्टोबर रोजी मासिक पाळी रजा धोरण (MLP) 2025 ला मंजुरी दिली होती. याचा फायदा सरकारी महिला कर्मचाऱ्यांसोबतच, खाजगी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही मिळेल.