Kargil War : कारगिल विजय दिन; पंतप्रधानांनी लिहिले- शूर सुपुत्रांच्या धाडसाला सलाम; 2 केंद्रीय मंत्र्यांनी द्रासमध्ये शहिदांना वाहिली श्रद्धांजली
कारगिल विजय दिनाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लडाखमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमात मनसुख मांडवीय आणि संजय सेठ या दोन केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. १९९९ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. गेल्या वर्षी २५ व्या कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली.