NDA : उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी NDA खासदारांचे डिनर रद्द; देशातील अनेक राज्यांत आलेल्या पुरामुळे बदलला निर्णय
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या एक दिवस आधी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारा एनडीए खासदारांचा डिनरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच, शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी भाजप खासदारांचा डिनरचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.