Devendra Fadnavis : उपराष्ट्रपती निवडणूक निकालावरून CM फडणवीसांचा टोला- विरोधक तोंडावर पडले, त्यांना स्वत:ची मते राखता आली नाहीत
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. निवडणुकीआधी विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केले. ते जास्त बोलले. एनडीएचे मते फोडू असे सांगितले. पण उलटेच झाले. विरोधकांना स्वत:ची मते देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यांची मोठी संख्या आमच्या एनडीए उमेदवाराला गेली आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचे आणि तोंडावर पडायचे, अशी अवस्था विरोधकांची आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.