Venezuela : अमेरिकेवर व्हेनेझुएलामध्ये सोनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप; प्रत्यक्षदर्शी गार्ड म्हणाला- हल्ल्यादरम्यान सैनिकांना रक्ताच्या उलट्या झाल्या
अमेरिकेवर व्हेनेझुएलाने सोनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, या ऑपरेशनदरम्यान अमेरिकन सैन्याने एक अत्यंत शक्तिशाली आणि आतापर्यंत न पाहिलेले शस्त्र वापरले, ज्यामुळे व्हेनेझुएलाचे सैनिक पूर्णपणे हतबल झाले होते.