Alia Bhatt : आलिया भट्टची 77 लाखांची फसवणूक, माजी सहायकाला अटक; बनावट कागदपत्रांवर स्वाक्षरी करून अकाउंटमधून पैसे लंपास
आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकावर आलियाची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, वेदिकाने गेल्या २ वर्षांपासून अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटले आहेत. वेदिका १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहील. तिचा शोध सुमारे ५ महिन्यांपासून सुरू होता. मुंबई पोलिसांनी तिला बंगळुरू येथून अटक केली आहे.