Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसमध्ये मोठा वाद, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात वरिष्ठ नेते एकवटले
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील वाद खूप वाढला आहे. मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात एकवटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचे काही वरिष्ठ नेते संतप्त झाले आहेत.