Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा
कोल्हापूरमधील माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाने आक्षेप घेतला आहे. माधुरीला मुक्तपणे फिरण्यासाठी एक शांत जागा, तिच्या वेदना कमी करण्यासाठी आणि तिच्या आजारी पायांना व्यायाम देण्यासाठी एक तलाव आणि तिच्या अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रगत पशुवैद्यकीय उपकरणे आणि कौशल्याची आवश्यकता आहे. वनतारा हे सर्व प्रदान करते आणि सध्या महाराष्ट्रात अशी दुसरी कोणतीही सुविधा नसल्याचा दावा PETA ने केला आहे. जर हे चित्र बदलले आणि महाराष्ट्रात तशा सुविधा तयार झाल्या तर, PETA इंडिया तिच्यावर उपचार करण्यास विरोध करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.