ओबीसी आरक्षण वाचवायच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानावर!!
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन निवडणुका लढवायचा प्रयोग केला, पण त्याला फार मर्यादित यश मिळाले. महापालिकांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसने वेगळा मार्ग पत्करून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ओबीसी बहुजन आघाडीशी युती केली. त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी सुद्धा ओबीसी आरक्षण वाजवायच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानावर आली.