Jammu Kashmir : भूस्खलनातील मृतांमध्ये 34 वैष्णोदेवी यात्रेकरू; जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर; 41 ठार, पुरामुळे रस्ते-पूल तुटले
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला.