Vaishnavi Hagavane suicide case : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने 3 दिवसांत मागवला अहवाल; सासरा-दिराला 28 मेपर्यंत कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे सात दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी आज सकाळी दोघांना स्वारगेट येथून ताब्यात घेतले. दुपारी त्यांना शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात नेत असताना भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या गाडीवर टोमॅटो फेकून संताप व्यक्त करण्यात आला.