Vaibhav Taneja : एलन मस्क यांच्या राजकीय पक्षाचे आर्थिक व्यवहार पाहणार भारतीय वंशाचे वैभव तनेजा; सुंदर पिचाईंपेक्षा 12 पट जास्त कमाई
भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांना एलन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्ष ‘अमेरिका पार्टी’चे कोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे. याचा अर्थ असा की ते आता मस्क यांच्या पक्षाच्या आर्थिक बाबींची जबाबदारी सांभाळतील. वैभव हे टेस्लाचे सीएफओ देखील आहेत. त्यांनी कमाईच्या बाबतीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना मागे टाकले आहे.