Vadettiwar : काॅंग्रेसकडून आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग, वडेट्टीवार यांचा नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी ताेडगा काढल्यानंतर आता ओबीसींना भडकावत आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देण्याची तयारी काॅंग्रेसने केली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय रंग देत आहेत. स्वतःच्या पक्षीय हितासाठी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजप व शिंदे गटाकडून केली जाते.