Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी या हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिलला निघाले होते. या अपघातामागील कारण सध्या तपासले जात आहे.