Himachal Pradesh : धर्मशाळात 15-20 मजूर वाहून गेले, 2 मृतदेह सापडले; कुल्लूत 3 ठिकाणी ढगफुटी, वडील-मुलीसह 3 जण वाहून गेले
हिमाचल प्रदेशात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. कुल्लू जिल्ह्यातील तीन ठिकाणी, सैंज खोऱ्यातील जीवा नाला, गडसा खोऱ्यातील शिलागड आणि बंजरमधील होरंगध येथे ढग फुटी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका वडील आणि मुलीसह तीन जण पाण्यात वाहून गेले.