Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधून हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यास अटक
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद पोलिस आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त पथकाने हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील रहिवासी उल्फत हुसेन हा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि तो १८ वर्षे फरार होता.