US Aircraft : इराणकडे येत आहे अमेरिकन युद्धनौका, शक्तिशाली विमानवाहू USS अब्राहम लिंकनचाही समावेश; आधी दक्षिण चीन समुद्रात होती तैनात
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान, अमेरिका इराणच्या आसपास आपली लष्करी उपस्थिती वाढवण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या नौदलाचे USS अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुपसह दक्षिण चीन समुद्रातून मध्य पूर्वेकडे रवाना झाले आहे.