Trump : ट्रम्प यांनी 19 देशांतील लोकांची नागरिकत्व प्रक्रिया थांबवली; ग्रीन कार्डही मिळणार नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 देशांच्या नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व आणि ग्रीन कार्ड देण्याची प्रक्रिया तात्काळ प्रभावाने थांबवली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसजवळ नॅशनल गार्ड्सवर एका अफगाण निर्वासिताने केलेल्या गोळीबारानंतर घेण्यात आला आहे.