US Treasury : ट्रम्प-पुतिन चर्चा अयशस्वी ठरल्यास भारतावर आणखी टॅरिफ लादणार; अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांची धमकी
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी पुन्हा एकदा भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. ब्लूमबर्गशी बोलताना त्यांनी सांगितले की, हे कर शुक्रवारी अलास्कामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातील बैठकीच्या निकालावर अवलंबून असतील.