US : अमेरिकेने आणखी 116 भारतीयांना केले हद्दपार; पुरुषांना हातकड्या, 5 तासांनंतर अमृतसर विमानतळावरून घरी पाठवले
अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी ११६ भारतीयांना जबरदस्तीने हद्दपार केले. यावेळी, महिला आणि मुले वगळता सर्व पुरुषांना हातकड्या घालून शनिवारी रात्री ११.३० वाजता अमेरिकन हवाई दलाच्या विमान ग्लोबमास्टरमध्ये अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आले.