JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्या घरावर हल्ला; खिडक्यांच्या काचा फुटल्या, पोलिसांनी एका संशयिताला पकडले; हल्ल्याचे कारण अस्पष्ट
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील घरावर हल्ला झाला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, त्यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.