अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात युक्रेन मधली दुर्मिळ खनिजे अमेरिकेला द्यायला झेलेन्स्की तयार; पण त्या मागेही त्यांचा वेगळा “डाव”!!
रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने युक्रेनला केलेल्या मदतीच्या बदल्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन मधल्या दुर्मिळ खनिजांवर अमेरिकेचा हक्क सांगितला. अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या 350 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात युक्रेनने त्यांच्याकडील दुर्मिळ खनिजे अमेरिकेला द्यावीत अशी मागणी केली.