US tax : अमेरिकी करात 145% पर्यंत वाढ; चीनचा लढण्याचा निर्धार, फेंटेनाइल तस्करीमुळे 20% जास्तीची करवाढ
अमेरिकेने चीनवरील व्यापार कर (टेरिफ) १२५% वरून १४५% पर्यंत वाढवला आहे. फेंटनाइलच्या तस्करीत चीनचा हात असल्याने २०% अतिरिक्त कर लावण्यात येईल. एक दिवस आधीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १२५% कराची घोषणा केली होती. दरम्यान, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाच्या तिढ्यावर तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. तथापि, टेरिफ दादागिरीसमोर झुकणार नाही, असे संकेत देऊन या मुद्द्यावर अमेरिकेला आधी पाऊल उचलावे लागेल, असे चीनने म्हटले आहे.