• Download App
    US Tariffs | The Focus India

    US Tariffs

    GDP : फिचने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला; अमेरिकन टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होईल

    जागतिक रेटिंग एजन्सी फिचने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.५% वरून ६.९% पर्यंत वाढवला आहे. देशांतर्गत मागणी आणि मजबूत आर्थिक क्रियाकलापांमुळे हा बदल झाला आहे.

    Read more

    US Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कांमुळे पंजाबला 30,000 कोटी रुपयांचे नुकसान; कापड निर्यातीत 8,000 कोटींचा फटका

    अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफ वॉरमुळे पंजाबच्या उद्योगाला ३०,००० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे. अनेक उद्योगपतींचे ऑर्डर थांबले आहेत. टॅरिफमुळे एकट्या पंजाबच्या ७ औद्योगिक क्षेत्रांना २०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

    Read more

    CM Fadnavis : ठाकरे बंधूंना एकत्र राहण्याची सुबुद्धी मिळो; मुख्यमंत्री फडणवीसांचे अमेरिकेच्या टॅरिफवरही भाष्य

    गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीगणेशाने दोन्ही भावांना सुबुद्धी दिली आहे. त्यांनी कायम एकत्र राहावे, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारत ट्रम्प यांच्या टॅरिफला नक्कीच तोंड देईल आणि या आव्हानाला संधीमध्ये बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Read more

    US Tariff : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारताला फायदा; भारताला गुंतवणूक केंद्र बनण्याची संधी

    अमेरिकेची नवीन टॅरिफ पॉलिसी भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. अलिकडच्या एका अहवालानुसार, अमेरिका भारतावर निश्चित टॅरिफपेक्षा कमी टॅरिफ लादू शकते. दुसरीकडे, इंडो-पॅसिफिकमधील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारावे लागेल. यामुळे भारतात परदेशी गुंतवणुकीच्या संधी वाढू शकतात आणि देशाची उत्पादन क्षमता बळकट होऊ शकते.

    Read more

    US Tariffs : अमेरिकेच्या बांगलादेशवर 35% करांमुळे भारताला फायदा; कापड कंपन्यांना भागीदारी वाढवण्याची संधी

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशवर ३५% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय कापड क्षेत्रातील शेअर्समध्ये ८% पर्यंत वाढ झाली आहे.

    Read more