US Launches : भारतावर पुन्हा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका; 16 व्यावसायिक भागीदारांविरुद्ध चौकशी सुरू
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनसह आपल्या 16 प्रमुख व्यापारी भागीदारांविरोधात ‘कलम 301’ अंतर्गत नवीन चौकशी सुरू केली आहे. ‘कलम 301’ अमेरिकेला अशा देशांवर एकतर्फी कर वाढवण्याचा अधिकार देतो, जे त्याच्या कंपन्यांना नुकसान पोहोचवत आहेत.