डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा उगारताच चीनला भासली भारताच्या मदतीची गरज!!
एरवी भारताशी सीमेवरून पंगा घेणाऱ्या चीनला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा उगारताच भारताच्या मदतीची गरज भासू लागली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भाषेचा पिसारा फुलवून ड्रॅगन आणि हत्तीच्या एकत्र डान्सची संकल्पना मांडली.